थोर्स वेल

अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.

क्युनका

स्पेनमधील क्युनका हे गाव डोंगरातील दगडांवरील विशिष्ट प्रकारच्या घरांसाठी प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात हे गाव वसविण्यात आले. याची रचना आणि त्याचा ऐतिहासिक ठेवा स्पेनने जपला आहे.

एंजेल धबधबा

व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्‍या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.

सुर्त्से बेट

आईसलॅंडमधील सुर्त्से बेट हे १९६३ ते ६७ या काळात ज्वालामुखी उद्रेकानंतर तयार झाले आहे. मानवविरहित असणारे हे बेट शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळाच बनले आहे.

रिला मठ

बुल्गेरियातील रिला मॉनस्ट्री (मठ) चा शोध १०व्या शतकात सेंट जॉन यांना लागला. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या मठाची १८३४ ला पुनर्बांधणी करण्यात आली. मठाचे आध्यात्मिक क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

गूढ मेटेओरा

ग्रीसमधील मेटेओराची निर्मिती १४व्या शतकात करण्यात आली आहे. मेटेओरा हे त्याच्या वैशिष्टपूर्ण उभारणीसाठी प्रसिध्द आहे. ३७३ मीटर उंच सुळक्यावर त्याची उभारणी करण्यात आली आहे.

नियोस्चवॉतन किल्ला

नियोस्चवॉतनचा किल्ला जर्मनीतील सर्वात भव्य किल्ला आहे. १९व्या शतकातील कल्पनाशक्तींचे प्रतीक असलेला हा किल्ला फुलनॅट नदीच्या खोर्‍यात आहे. याच्या बांधकामासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.

ओगाशिमा

जपानमधील टोकियोपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले ओगाशिमा हे ज्वालामुखीनिर्मित बेट जगातील सुंदर बेटांपैकी एक आहे. १७८१ ते १७८५ या काळात या बेटाची निर्मिती झाली.

कॅमेरुन – मध्य आफ्रिकेतील चिमुकला देश

कॅमरुन हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखातातील एक छोटासा देश आहे. कॅमेरुनमध्ये बांतूभाषीय लोक व मुस्लिम फुलानी लोकांची वस्ती होती. १५व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत केली. मात्र, १७ व्या शतकात डचांकडून ते पराभूत झाले. १८८४ मध्ये जर्मनांनी कॅमेरुनचा ताब घेतला.पहिल्या महायुध्दात जर्मनांनी येथून माघार घेतली. दुसर्‍या महायुध्दानंतर […]

बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर

बागलकोट हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर असून या शहरात हजारो वर्षाचा इतिहास आहे. एका शिलालेखावरील उल्लेखानुसार या शहराचे नाव बागडिगे असे होते. रावणाने हे शहर आपल्या वाजंत्र्यांना भेट दिले होते. हेच शहर विजापूरच्या […]

1 47 48 49 50 51 89