कराड – यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी

कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर असून यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणूनही ते ओळखले जाते.  महाराष्ट्राचे माजी  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा कराडचेच. महाराष्टाचे कार्ल मार्क्सं म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव मोहिते हेही कराड तालुक्यातीलच. कराडमध्ये कृष्णा व कोयना या महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या नद्यांचा […]

खान्देशातील पाचोरा शहर

पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पाचोरा हे खान्देशातील एक महत्त्वाचे शहर आहे. पाचोरा हे मध्य रेल्वेच्या मार्गावरचे भुसावळ नजीकचे मोठे जंक्शन असून राज्य महामार्ग क्रमांक १९ वर ते येते.   हे शहर राज्य मार्ग तसेच लोहमार्गानी […]

महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण

फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण व महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. फलटणचे श्रीराम मंदिर प्रसिध्द असून येथे साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत रथोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी […]

जळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ

शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे. जळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे. येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर […]

शहीद शिरीषकुमारांचे नंदुरबार

महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले  नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या हे शहर खानदेशात येते. […]

भुसावळ

भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात मध्य रेल्वेचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे.  येथे मध्य रेल्वेचे मोठे विद्युत निर्मिती केंद्र आहे. भुसावळची केळी सुप्रसिध्द असून अजठा लेणी इथून अवघ्या ६० किलोमिटरवर आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हे शहर तापी […]

बापू कुटीचे सेवाग्राम

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे. १९२१ साली या सेवाग्राम आश्रमाची स्थापना करण्यात आली. आश्रम स्थापन करण्यात जमनालाल बजाज, विनोबा भावे यांचा सहभाग होता. गांधीजींनी वास्तव्य […]

बालकवींचे जन्मगाव – धरणगाव

धरणगाव हे जळगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात माळी समाजाच्या लोकांची मोठी संख्या आहे. बालकवी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचे हे जन्मगाव. सुरतेच्या मोहिमेवर जाताना छत्रपती […]

श्री श्रीहरिहरेश्वर

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ आहे. येथील शिव मंदिर जगप्रसिध्द आहे. कोकणातील लोक विविध धार्मिक विधीसाठी श्री हरिहरेश्वरला महत्त्व देतात. निसर्ग सौदर्य व स्वच्छ सुंदर सागरी किनारा येथील दुसरे आकर्षण […]

महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर इचलकरंजी

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगामधील पूर्वेकडील मँचेस्टर म्हणून ओळखले आहे. सुमारे दीड लाख यंत्रमाग या शहरात आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २ लाख ८७ हजार इतकी आहे. कोल्हापुरातून रस्त्याने हे शहर २३ […]

1 81 82 83 84 85 89