सिंधूदुर्गातील रेडीचा गणपती

रेडी हे गांव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असून तेथील गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सुप्रसिद्ध गणपती आहे. रेडी येथील यशवंत गड किल्ल्यावर हे गणेशस्थान असून हा गणपती प्राचीन आहे. वेंगुर्ले व सावंतवाडी येथून रेडीस जाण्यास […]

कोल्हापूरचा साक्षीविनायक

साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे. […]

ठाणे येथील मांदार सिद्धीविनायक

ठाणे स्थानकाच्या पश्चिम बाजूच्या स्टेशन रोड वर (सुभाष पथ) पायी १० ते १५ मिनिटाच्या अंतरावर जांभळी नाक्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकात मांदार सिद्धिवियकाचे मंदिर आहे.  हे मंदिर खाजगी मालकीचे असून दररोज भक्तांसाठी उघडे असते. सुमारे ३०० वर्षापूर्वी श्री पंडित यांच्या पुर्वजांना दृष्टांत झाला की  ‘मी मांदार झाडाखाली असून […]

फडके गणपती, गिरगांव मुंबई

मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्टेशनापासून २० मिनीटाच्या अंतरावर फडके वाडीत हे देवस्थान आहे. कै श्री. गोविंद गंगाधर फडके यांनी हे गणेश मंदिर बांधले आहे. गणेश मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंड मोदकाकडे वळलेली आहे. मूर्ती चर्तुभूज […]

सारस बागेतील सिद्धीविनायक, पुणे

पुण्याच्या पेशवे पार्क जवळील सारस बागेमध्ये सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर आहे. यालाच तळ्यातील गणपती म्हणतात. हैदर अलीवर स्वारीसाठी निघण्याआधी माधवराव पेशवे यांनी हे तळे नीट डागडूजी करून त्यात थेऊरच्या गणपतीची प्रतिकृती स्थापन केली. पुढे […]

पुणे येथील कसबा गणपती

कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे. इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईनी ह्या गणेशाची समारंभपूर्वक स्थापना केली. […]

सिद्धटेकचा श्री सिद्धी विनायक

श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्री क्षेत्र सिद्धटेक हे अहमदनगर जिह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या […]

रांजणगावचा श्री महागणपती

मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे. […]

थेऊरचा श्री चिंतामणी

थेऊरचा श्री चिंतामणी हासुद्धा अष्टविनायकातला एक गणपती. थेऊर हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे.  ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. पुणे-सोलापुर महामार्गावर हडपसरच्या नंतर लोणीच्या पुढे ३ […]

महडचा श्री वरद विनायक

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा गणपती. हे स्वयंभू स्थान आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंहासनारूढ आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. […]

1 2 3