श्री बल्लाळेश्वर. पाली जि. रायगड

रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर.  श्री बल्लाळेश्वर  हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. मुंबईहून पनवेल-खोपोली मार्गे पाली १२४ किमी.  असून पनवेल-पेण-वडखळ-नागोठणे-वाकण मार्गे पाली १०८ किमी . […]

मोरगावचा श्री मोरेश्वर

अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. मोरगाव हे कऱ्हा नदीच्या काठी वसले असून पुण्याहून साधारणत: दीड तासात मोरगावला जाता येते. पुणे – हडपसर – सासवड – जेजूरी- मोरगाव हा ६४ कि. मी. अंतराचा रस्ता आहे. […]

श्री महागणपती, टिटवाळा

सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली […]

अहमदनगरचा विशाल गणपती

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे ग्राम दैवत आहे. या गणपतीची माळीवाडा गणपती अशीही ओळख सर्वदूर आहे. गणपतीच्या मूर्तीची उंची ११ फूट असून जागृत देवस्थान म्हणून याला महत्त्व आहे.

चिंचवड गावातील मोरया गोसावी गणेश मंदिर

पुणे शहराचे उपनगर असणार्‍या चिंचवड गावात पवना नदीकाठी असलेल्या मोरया गोसावी गणपतीची मोठी महती आहे. या गणपती मंदिराच्या बांधकामाला १६५० मध्ये प्रारंभ झाला व १७२० मध्ये हे काम पूर्ण झाले. यातील मंगलमूर्तीचे देवघर मात्र १६०५ […]

कृष्णाकाठचे वाई

वाई हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये ढोल्या गणपतीचे मंदिर बनविले. सिध्देश्वर मंदिरातील सिध्दनाथांची संजीवन समाधी, समर्थ रामदास यांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान […]

1 2 3