थेन्मला

थेन्मला हे केरळच्या कोलम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले शहर आहे. पुनालूर या शहराजवळ ते वसलेले आहे. अनेक तमिळ आणि मल्ल्याळम चित्रपटांचे शूटिंग.

या निसर्गसंपन्न शहरात होते. अनेक देशी-विदेशी पर्यटकांचे हे आवडते पर्यटनस्थळ आहे. या शहराजवळचा पल्लारुची नावाचा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

पर्यटकांचे आवडते शहर
थेन्मला येथील अदभुत म्युझिकल फाउंटन शो पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतो. अनेक हिंदी, तमिळ, मल्ल्याळम गीतांच्या तालावर नाचणारे तुषार पर्यटकांना सुखावतात. त्रिवेंद्रम व पुनालूर येथून केरळ शासनाच्या किंवा खासगी बसने थेन्मला येथे जाता येते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*