त्रिचूर हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या केरळमधील शहरांच्या यादीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. हे शहर थेक्कीनकाडू नावाच्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात वसलेले असून, येथील वडुक्कुमनाथन मंदिर प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या कोचीन साम्राज्याच्या राजधानीचे हे शहर होते. तिरुवअनंतपूरम पासून ३०० किलोमीटरवर ते वसलेले आहे.
सांस्कृतिक राजधानी
त्रिचूर हे शहर केरळच्या सांस्कृतिक राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. केरळ संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी व साहित्य अकादमी याच शहरात आहे. त्रिचूरपूरम महोत्सव’ हा येथील सर्वाधिक लोकप्रिय उत्सव आहे.
Leave a Reply