पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणला जातो.
पूर्व तिमोर हा २१व्या शतकामध्ये स्वातंत्र्य मिळालेला पहिला देश आहे. १९७५ साली पूर्व तिमोरने पोर्तुगालपासुन स्वातंत्र्याची घोषणा केली, पण त्याच वर्षी इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर लष्करी कारवाई करून कब्जा मिळवला व पूर्व तिमोर आपल्या देशाचे २७वे राज्य असल्याचे जाहीर केले. १९९९ साली इंडोनेशियाने माघार घेतल्यानंतर २० मे २००२ रोजी स्वतंत्र पूर्व तिमोर देशाला मान्यता देण्यात आली.
अनेक वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे पूर्व तिमोरची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. पूर्व तिमोरचा मानवी विकास सूचक आशियातील देशांमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. येथील ३७ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली जगत आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :दिली
अधिकृत भाषा :पोर्तुगीज
राष्ट्रीय चलन : अमेरिकन डॉलर
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply