तुळजापूर – तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबाद शहरापासून २५ कि.मीवर.
आहे.
कळंब – कळंब हे या जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.अंतरावर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे.
परांडा – परांडा हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण विशेष करुन किल्ल्यांसाठी प्रसिध्द आहे.
तेरचे पुराण वस्तू संग्रहालय – उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पुराण वस्तू संग्रहालय प्रसिध्द आहे. येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट.
याव्यतिरिक्त या जिल्ह्यात संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, परांदा किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर ही आवर्जून पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
Leave a Reply