मुरली- येथे पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे.
पुसद – पूस नदीवरील पुसद हे ऐतिहासिक महत्वाचे गाव आहे. वाकाटक कालीन शिवमंदिराचे अवशेष येथे सापडले आहेत.
कळंब – विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फु. खोल आहे. श्री गणेशाच्या २१ पीठांपैकी श्री चिंतामणी गणेशाचे हे स्थान आहे. येथील श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे.
वणी – निर्गुडा नदीवरील हे स्थान श्री रंगनाथ स्वामींचे समाधी स्थळ आहे.
राळेगाव – हे तहसिलीचे मुख्यालय असून येथे लाकूड कटाईच्या गिरण्या तसेच जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स आहेत.
याचबरोबर घंटीबाबा जत्रा (दिग्रस), घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, महागाव, तपोणा येथील जत्रा हे पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे.
Leave a Reply