कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून प्रवाशांना अनेक फायदे होत आहेत. कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्र्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर -मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*