पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, पुणे-हैद्राबाद,राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ व पुणे-नाशिक,राष्ट्रीय महामार्ग क्र.५० हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातत. महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरील अनेक दळणवळण अधिक सोयीचे बनले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला असल्याने याला एक आगळे महत्त्व आहे.भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहेत. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळ हे राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहे.
Leave a Reply