महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्ग पनवेल, खोपोली या तालुक्यांतून जातो. तसेच या जिल्ह्यातून मुंबई – पुणे – बंगलोर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) व मुंबई – गोवा – मंगलोर महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) असे दोन महामार्गही जातात. १८५६ मध्ये वाहतूकीस खुला करण्यात आलेला मुंबई – पुणे लोहमार्ग व एक आदर्श प्रकल्प म्हणून गणली जाणारी कोकण रेल्वे हे दोन लोहमार्ग या जिल्ह्यातील महत्त्वाचे लोहमार्ग आहेत. याशिवाय पनवेल जवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. सह्याद्रीच्या रांगा ओलांडून जिल्ह्यापलीकडे जाताना भीमाशंकर, बोर, लिंगा, कुंभा, कावळ्या, शेवत्या, वरंधा, ढवळा यांसारखे घाट पार करावे लागतात.
Leave a Reply