ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिसियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
प्रागैतिहसिक काळात ह्या भागावर रोमनांची सत्ता होती. रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४९ साली जवळजवळ सर्व भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. सातव्या शतकादरम्यान माघरेबवर अरब मुस्लिम लोकांनी कब्जा मिळवला. येथील कैरूवान हे उत्तर आफ्रिकेमधील पहिले इस्लामिक शहर होते. १५३४ साली ओस्मानी साम्राज्याने सर्वप्रथम ट्युनिसियावर अधिपत्य मिळवले. पुढील ३०० हून अधिक वर्षे ओस्मानी साम्राज्याचा भाग राहिल्यानंतर १८८१ साली फ्रान्सने ट्युनिसियावर आक्रमण करून येथे आपले मांडलिक राज्य स्थापन केले.
१९५६ साली ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळाले. हबीब बुरग्विबा हा ट्युनिशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. २०११ साली ट्युनिसियन जनतेने केलेल्या क्रांतीदरम्यान भ्रष्ट व लाचखोर राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदिन बेन अली ह्याची सत्ता उलथवून टाकली गेली व ट्युनिसियामध्ये लोकशाहीवादी सरकार स्थापन झाले.
राजधानी व सर्वात मोठे शहर :ट्युनिस
अधिकृत भाषा :अरबी, फ्रेंच
राष्ट्रीय चलन :ट्युनिसियन दिनार
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply