तुर्कमेनिस्तान (रशियन Туркмения, तुर्कमेन Türkmenistan ) मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचा एक घटक होता.. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
११ व्या शतकात तुर्कमेन लोकांचे या भागात आगमन झाले. इ.स. १८८० मध्ये तुर्कमेनिस्तानवर रशियाने कब्जा केला व तुर्कमेनिस्तान रशियन तुर्कीस्तानचा एक भाग झाला. इ.स. १९२५ मध्ये हे तुर्कमेन सोव्हिएत संघाचे गणराज्य झाले. इ.स. १९९१ साली सोव्हिएत संघ राज्यापासून संपूर्ण स्वतंत्र होऊन तुर्कमेनिस्तान म्हणून अस्तित्वात आले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सपार्मुरात नियाझोव डिसेंबर २१ २००६ पर्यंत तुर्कमेनिस्तानचा तहहयात राष्ट्रप्रमुख होता. त्याच्या मृत्यूनंतर गर्बांगुलाय बेर्दिमुहम्मेदोव हा कार्यकारी राष्ट्रप्रमुख झाला. नंतर फेब्रुवारी ५, २००७ ला झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तोच विजयी होऊन तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची त्याने फेब्रुवारी १४ २००७ रोजी शपथ घेतली.
मध्य आशियात वसलेला तुर्कमेनिस्तान ३५° उ. ते ४३° उ. अक्षांशांदरम्यान आणि ५२° पू. ते ६७° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. ४,८८,१०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला ह देश जगातील बावन्नाव्या क्रमांकाचा देश आहे. स्पेनच्या आकारमानापेक्षा याचे आकारमान थोडेसे कमी पण कॅलिफोर्नियापेक्षा काहीसे जास्त आहे. तुर्कमेनिस्तानला १७६८ किलोमीटरचा कॅस्पियन समुद्राचा किनारा लाभलेला आहे.
तुर्कमेनिस्तानच्या दक्षिणेस इराण, आग्नेयेस अफगाणिस्तान, इशान्येस उझबेकिस्तान तर वायव्येस कझाकस्तान हे देश आहेत. तुर्कमेनिस्तानच्या पश्चिमेस कास्पियन समुद्र आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :अश्गाबाद, अश्काबाद
अधिकृत भाषा :तुर्कमेन
राष्ट्रीय चलन :तुर्कमेनिस्तानी मानाट (TMM)
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply