MENU

संयुक्त राष्ट्रसंघ आणि भारत

संयुक्त राष्ट्रे (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स) ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे.

या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी संयुक्तराष्ट्रांच्या सनदेनुसार आंतरराष्ट्रीय व्यव्हार करायचे, जागतिक शांतता व सुरक्षा रक्षण, परस्पर सहकार्य, मानवी मूल्यांची जपणूक आदी बंधने स्वत:वर लादून घेतली आहे. संघटनेचे १९३ सदस्य राष्ट्र आहेत.

१ जानेवारी १९४२ साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र संघच्या संस्थापक सदस्य देशांपैकी भारत एक आहे.

सॅन फ्रान्सिस्को येथे २५ व २६ जून १९४५ साली झालेल्या ऐतिहासिक परिषदेमध्ये भारत सहभागी होता.

संयुक्त राष्ट्र संघाच्या ध्येयधोरणांचे भारताने खंबीरपणे समर्थन केले. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*