पुणे विद्यापीठ

University of Pune

एकेकाळी पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर अशी होती. ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेले पुणे विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली झाली. डॉ एम. आर. जयकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. नुकतेच या विद्यापीठाचे नामांतर करण्यात आले. आते ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाते.

५७ पदव्युत्तर विभाग आणि संशोधन केंद्र, ६ आंतरराष्ट्रीय केंद्र, ६१३ पदवी महाविद्यालये, २२८ संस्था व १९८ संशोधन केंद्र पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. पुणे विद्यापीठाच्या ४११ एकरमध्ये पसरलेल्या प्रशस्त आवारात खगोलशास्त्रावर संशोधन करणारी `आयुका’ ही संस्था तसेच संगणकक्षेत्रातील `सी-डॅक’ ही संस्थाही कार्यरत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*