व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हियेतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. सुमारे ८.८ कोटी लोकसंख्या असलेला व्हियेतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हियेतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: सैगॉन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे.
इ.स. ९३८ साली साम्राज्यवादी चीनपासून व्हियेतनामला स्वातंत्र्य मिळाले. १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी ह्या भूभागावर आक्रमण करून येथे फ्रेंच इंडोचीन ही वसाहत निर्माण केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या पहिले इंडोचीन युद्धामध्ये हो चि मिन्हच्या नेतृत्वाखाली व्हियेतनामी सैन्याने फ्रान्सचा पराभव केला. १९५४ साली व्हियेतनामचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे करण्यात आले. मात्र एकत्रीकरणावरून पुन्हा झालेल्या व्हियेतनाम युद्धात उत्तरेची सरशी झाली व १९७६ साली व्हियेतनाम पुन्हा एकदा एकसंध बनला. पुढील एक दशक सोव्हियेत संघाच्या छत्रछायेत दारिद्र्य व एकाकीपणात काढल्यानंतर व्हियेतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने अनेक आर्थिक व राजकीय सुधारणा हाती घेतल्या.
या देशाची लोकसंख्या नऊ कोटी आहे. सुरुवातीचा बराच काळ पारतंत्र्यात असलेला हा देश इ स ९३८ मध्ये बाक डाँग नदीवरील युद्धात (Battle of Bạch Đằng River) चीनचा निर्णायक पराभव करून हा देश स्वतंत्र झाला. नंतर त्यावर अनेक व्हिएतनामी सम्राटांनी आता या देशाच्या ताब्यात आहे त्यापेक्षा अधिक प्रदेश काबीज करून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. त्यानंतर युरोपियन सत्तांचा त्या भागांत शिरकाव होवून तो फ्रेंच वसाहतीत सामील झाला. दुसर्या महायुद्धाच्या (इ स १९४० च्या) जवळपास काही काळ तेथे जपानी साम्राज्यही पसरले होते. व्हिएतनामच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात १८५४ साली त्यांनी फ्रेंचांना उत्तर व्हिएतनाममधून बाहेर काढले आणि त्या देशाची उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम अशी फाळणी झाली. मात्र पुढेही हे युद्ध कमी अधिक प्रमाणात चालूच राहिले आणि प्रथम फ्रेंच व नंतर १९७५ मध्ये अमेरिकेला दक्षिणेतून काढता पाय घ्यायला लावून उत्तरेतल्या कम्युनिस्टांनी सर्व देश एकसंध केला.
१९७८ मध्ये शेजारी कंबोडियाने व्हिएतनामच्या काही भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. व्हिएतनामने चिनी पाठिंबा असलेल्या कंबोडियाच्या ख्मेर रूज या जुलुमी राजवटीवर हल्ला करून तिचा पाडाव केला आणि कंबोडियाच्या पूर्वीच्या राजाला सत्तेवर आणले. असे वरवर दिसत असले तरी व्हिएतनामला सोविएत युनियनचा पाठिंबा होता आणि ख्मेर रुजला चीनचा; त्यामुळे हे युद्ध सोव्हिएत युनियन व चीन मधले छुपे युद्ध मानले जाते. व्हिएतनामवर दबाव टाकण्यासाठी चीनने व्हिएत-चीन सरहद्दीवर युद्ध छेडले आणि व्हिएतनामचा काही भागही व्यापला. मात्र चिवट व्हिएतनामने तेथे प्रतिकार तर केलाच पण कंबोडियावरची आपली पकडही कमी केली नाही. यासाठी त्यांना सोव्हिएत युनियनचा उघड पाठिंबा आणि सैन्य मदतही मिळाली. शेवटी चीनने आपले सैन्य व्हिएतनामच्या व्यापलेल्या भूमीतून मागे घेतले. मात्र व्हिएतनामी सैन्य कंबोडियात पूर्ण स्थिरस्थावर होईपर्यंत पुढची दोन वर्षे तेथेच तळ ठोकून होते.
राजधानी व सर्वात मोठे शहर :हनोई
अधिकृत भाषा :व्हियेतनामी
राष्ट्रीय चलन :डाँग
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply