वाडी हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयातील एक महत्त्वाचे शहर आहे या शहरात मोठे रेल्वे जंक्शन असून मुंबई , बंगलोर ,चेन्नई ,हैदराबाद येथून येणार्या अनेक एक्स्प्रेस गाड्या या स्थानकातून पुढे जातात.
या शहरात एसीसी कंपनीचे देशातील दोन मोठे सिमेंट प्लँट असून त्यांची क्षमता अनुक्रमे २.११ व २.०९ लाख मे.टन आहे तसेच येथे अनेक चुनखडीच्या खाणीही आहेत.
वाडी हे शहर एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द आहे येथून जवळच असलेले कोंचूर या गावातील पुरातन हनुमान मंदिर प्रेक्षणीय आहे. तसेच सुफी संत अस्थाना कादिरी हलकता शरीफ यांचा दर्गाही येथून जवळच आहे देशभरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
Leave a Reply