महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा ठिकाणी कलिंगडाची लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते. मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्यत्र मोठ्या प्रमाणावर असणारी सततची हमखास मागणी, पिकाचा कालावधी काय, सोपे लागवड तंत्रज्ञान आणि इतर पिकांच्या तुलनेत कमी उत्पादन खर्च या कारणांमुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात कलिंगडाची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते आणि म्हणून या पिकाला व्यापारी पीक म्हणून गणले जाते.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात या पिकाखाली सुमारे दोन हजार हेक्टर एवढे क्षेत्र असून दरवर्षी त्यात वाढ होत आहे
Leave a Reply