झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला अँगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कित्वे व न्दोला ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत.
आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. १८८८ साली सेसिल र्होड्सने येथे खाणकाम करण्याचे हक्क विकत घेतले. १९११ साली ब्रिटिश सरकारने हा भूभाग ताब्यात घेऊन येथे उत्तर र्होडेशिया ह्या प्रांताची निर्मिती केली. पुढील ५० वर्षे ब्रिटनच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर २४ ऑक्टोबर १९६४ साली झांबियाला स्वातंत्र्य मिळाले. केनेथ कोंडा हा स्वतंत्र झांबियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.
२०१० सालच्या जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणार्या देशांपैकी एक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर तांब्याच्या खाणकामावर अवलंबून आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेला व्हिक्टोरिया धबधबा झांबिया व झिंबाब्वेच्या सीमेवर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :लुसाका
अधिकृत भाषा :इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस :२४ ऑक्टोबर १९६४ (युनायटेड किंग्डमपासून)
राष्ट्रीय चलन :क्वाचा
( Source : Wikipedia )
Leave a Reply