गदिमांचे शब्द म्हणजे अर्थांच्या खाणी! 1953-54 च्या सुमारास गदिमांनी एकापाठोपाठ एक असे तीन चार रौप्यमहोत्सवी चित्रपट लिहिले. त्यातलाच हा चित्रपट, बाळा जो जो रे. हा चित्रपट प्रचंड चालला, त्यातलं बाळा जो जो रे हे गाणं अतिशय गाजले. या चित्रपटातलं हे भक्तीगीत ज्याच्यावर मराठवाड्यातील एक सत्पुरुष अडीच-तीन तास कीर्तन करत असत. तेच गीत आज आपल्यापुढे सादर होते. या चित्रपटात उषाकिरण, सूर्यकांत, इंदिरा चिटणीस आणि धुमाळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. संगीत वसंत पवार यांचं तर दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी यांचं.
Leave a Reply