
‘आत्मचित्र’ हे कवयित्री, लेखिका संजीवनी बोकील यांचे सध्या गाजत असलेले नवे पुस्तक! हे पुस्तक म्हणजे अलवारशा ललितलेखांचा एक रंगीत गुच्छच आहे. लेखिकेच्या मनातले सकाराचे सूर्योदय या पुस्तकाच्या पानापानावर तिने मांडून ठेवले आहेत. शालेय मुलींपासून ते ८०/९० वयाच्या वयस्कांनाही आवडणा-या या पुस्तकातली काही भावचित्रे आता आपल्यापुढे अभिवाचनातून सादर होतत आहे. आजच्या चौथ्या भागात अभिवाचन करत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देशमुख ‘गुरुजींचा हात,देवाचा हात’ या ललितलेखाचे! शिक्षणक्षेत्रातले एक मजेदार अनुभव लेखिकेने यात गुंफला आहे.
Leave a Reply