रसिकहो गदिमा स्वतः एक एकपत्नीव्रती होते. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवार पैकी कोणी नीती बाह्य वर्तन केलं तर ते अतिशय व्यथित होत असत. शक्यतो त्या गृहस्थाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्या गृहस्थाच्या पत्नीबद्दल त्यांना अपार अनुकंपा वाटत असत. त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे पारिजातक संगीतिकेतुन घेतलेलं हे गीत, ‘बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी’.
Leave a Reply