झोंबी ही मराठी लेखक आनंद यादव यांनी लिहलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. पु.ल. देशपांडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहलेली असून या पुस्तकानंतरचे नांगरणी, घरभिंती, आणि काचवेल हे तीन भाग प्रसिद्ध झालेले आहेत. शाळेत जाऊन शिकण्यासाठीची आनंद यादव यांची धडपड आणि शाळा शिकू न देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी दिलेला मार आणि त्यांचे या काळातले इतर अनुभव आणि त्यांचे शाळा आणि शिक्षकांबद्दलचे विचार या कादंबरीत आहेत.
झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी. या पुस्तकाला साहित्य क्षेत्रातील मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला असून या पुस्तकाचे हिंदी, कन्नड आणि बंगाली भाषेत अनुवाद झालेले आहेत.
Leave a Reply