घोरपडे, अभिजित

अभिजीत घोरपडे हा निसर्गाविषयी अभिरूची असलेला एक तरूण पत्रकार, निसर्गतज्ञ, व हवामानाचे अचूक मोजमापन व त्यांसंबंधीचे शास्त्रीय विश्लेषण लोकसत्ता वृत्तपत्राद्वारे वाचकांपर्यंत सोप्या शैलीत पोहोचविणारा लेखक आहे. जीवनात आतापर्यंत कितीतरी बहुआयामी कामे त्याने केलेली आहेत. काही त्याच्यामधील आभ्यासु विद्यार्थ्याला वाव देणारी, काही त्याच्यामधील प्रतिभावंत कलाकाराला न्याय देणारी तर काही त्यांच्या मधील चळवळ्या समाजसेवकाला अधिक परिपुर्ण बनविणारी. अभिजीत घोरपडे हा अतिशय दक्ष व सतत डोळ्यात तेल घालून सामाजिक अस्मितेचे रक्षण करणारा धडाडीचा पत्रकार असण्याबरोबरच तो त्याला शाहारून टाकणार्‍या सूंदर पक्ष्यांचा, प्राण्यांचा व नद्यांचा सच्चा मित्रदेखील आहे. जागतिकीकरणाबरोबर गहिर्‍या व गुंतागुंतीच्या होत चाललेल्या खंडीभर पर्यावरणीय समस्यांना त्याने त्याच्या लेखनातून नेहमीच तोंड फोडले आहे. मानवाने उच्च तंत्रज्ञानाच्या जोरावर ज्या पशुप्क्ष्यांचा आवाज दाबून ठेवला होता त्यांना अभिजीत याने विवीध कार्यक्रमांमधून व पुस्तकांमधून बोलतं केलं आहे. त्याचे फोटो काढण्यामधील कौशल्य पाहिले तरी त्यांच्यातील बहुपैलुत्व धारण केलेल्या कलाकाराची खोली कळते. सामाजिक बांधीलकी वर अपार श्रध्दा ठेविणार्‍या अभिजीत याने पर्यावरणीय शोषणाविरूध्द जनतेचा बुलंद आवाज निर्माण करण्याचा पणच केलाय.

अभिजीत याचा जन्म डिसेंबर 5, रोजी सातार्‍यात झाला. मॉडर्न हाय स्कुल पुणे येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर 1989 साली पुणे विद्यापीठ येथे त्याने पदवी शिक्षण घेतले. आशावादी स्वभाव, निसर्गप्रेमी मन, व रसिकमय झालेली वृत्ती या व्यक्तित्वगुणांमुळे तो अनेक भटकंती शिबीरांमध्ये व गिर्यारोहक सहलींमध्ये हिरीरीने सहभागी झाला होता. पत्रकारितेत घुसल्यानंतर प्रथम त्याने लोकसत्ता मध्ये हवामानाचा अंदाज देणार्‍या कप्प्यामध्ये आपली जागा पक्की केली. छत्रपती शिवाजी महाराज, अजय अतुल यांच्या विचारांनी व कर्तुत्वानी प्रेरित झालेल्या अभिजीतने त्याच्या कारकिर्दीमध्ये उजनी तलाव, रोहिडा गड उर्फ विचीत्रगड अशा पर्यावरणप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी मानल्या जाणार्‍या अनेक ठिकाणांना भेटी देवून तिथल्या ढासळत चाललेल्या संतुलनावर प्रकाश टाकला. सुंदर फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मनाला वेड लावणार्‍या लीलादेखील त्याने कॅमेर्‍यात टिपल्या. संथ वाहाते….? या नद्यांच्या सद्यस्थितीचे चित्रण करणारे त्याचे पुस्तकदेखील बरेच गाजले. हे पुस्तक लिहीण्याआधी त्याने संबंधित सर्व नद्यांची स्थानिकांनी पुरविलेल्या तपशीलांवर बारकाईने माहिती मिळवीली होती. नद्यांचे अंतरंग व बाह्यरंग अगदी कलात्मक रितीने व देखण्या फोटोंसहित उलगडयाचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न भारतभर नावाजला गेला. या पुस्तकांमुळे नदीला पाहून भक्तीने तिच्यासमोर नतमस्तक होणार्‍या भक्तांना आपल्या श्रध्दास्थानांची काय विदारक अवस्था झाली आहे ही इत्यंभुत माहिती मिळाली. नदीमुळे निर्माण झालेल्या संस्कृत्या, तिच्याविषयी असणार्‍या लोकधारणा व श्रध्दाभाव, नद्यांवरील अतिक्रमणे, नदीतून नष्ट होत चाललेली जैवविवीधता, जल प्रदुषण, व वाळुचा बेसुमार उपसा या सद्यपरिस्थीतीवर त्याने बनविलेल्या ‘मरणासन्न नद्या’ या स्लाईड शोला देखील अमाप प्रसिध्दी मिळाली. या स्लाईड शो द्वारे, वरवरच्या उपाययोजनांवरती किंवा सरकारवरती विसंबुन राहण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळुन मुळ मुद्यांनाच हात घातला पाहिजे असे दर्शकांचे विचारमंथन करण्यास तो विसरला नाही. हवामानाचा अंदाज बांधणार्‍या रसदार लेखनाबद्दल त्याला सी. ई. ओ. अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*