अभिजीत झुंजारराव हे मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं नाव आहे. तसा अभिजीत अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच पण तो एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकही आहे. अभिजीत रंगभूमी नेहमी वेगवेगळे पण तेवढेच कलात्मक प्रयोग करीत असतो. आतापर्यंत अभिजीतने प्रेक्षकांची नस चुकीची पकडली आहे असे कधीच झाले नाही. त्याने बरीच नाटकं रंगभूमीवर आणली पण प्रत्येक नाटकात वैविध्य होतं. कुठलंच नाटक एकसारखं दिग्दर्शित केलं आहे असं जाणवत नसल्याने प्रेक्षकांनी नेहमीच त्याची नाटकं मनापासून पाहिली आणि दादही दिली. अभिजीत एक सच्चा रंगकर्मी आहे. त्याचे जेवढे प्रेम व्यावसायिक रंगभूमीवर आहे , तेवढेच प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीवरही आहे. आतापर्यंत त्याने माकड , दोजख , घटोत्कच , लेझीम खेळणारी मुलं सारखी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत.
अभिजीत जेवढा रंगभूमीवर सक्रिय आहे तेवढाच चित्रपट , मालिका , web series मध्येही. अभिजीतचे अभिनेता म्हणून पहिलं व्यावसायिक नाटक “शाश्वती” , पहिला चित्रपट “रेगे” आणि पहिली मालिका “गंगुबाई नॉन मॅट्रिक” ही होती. पुढे अभिजीतने ” पोस्टर बॉईज ” , ” पोस्टर गर्ल “ व बरेच मराठी चित्रपट केले. काही दिवसांपूर्वी अभिजीतने ” एक थी बेगम “ ह्या blockbuster web series मध्ये अभिनय केला होता.
आतापर्यंत अभिजीतला अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले होते , पण त्यातील नाट्य परिषदेतर्फे विनोदी अभिनयाकरिता शंकर घाणेकर , झी नाट्य गौरव हे विशेष लक्षात रहाणारे पुरस्कार ठरले.
## Abhijit Zunzarrao
Leave a Reply