सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६० रोजी झाला.
गिरीश ओक व्यवसायाने खरे डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा नाटकाशी तसुभरही संंबंध नाही. ते स्वत:ही वयाच्या १७ वर्षांपर्यंत नाटकाच्या संपर्कात आले नव्हते. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी नागपुरात रुग्णालय सुरू केले होते. यानंतर त्यांना वाटायला लागले की, हे आपले काम नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे. यामुळे ते अभिनय करायला मुंबईत गेले. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला.
आणखी काय हवे? हे नाटक गिरीश ओक यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरले आहे. तसेच ती फुलराणी मधील त्यांचे संस्मरणीय आहे.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply