आदिनाथ कोठारे हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र असून स्वतः अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९८४ रोजी झाला. बालपणापासूनच त्याला अभिनयाची गोडी होती.. महेश कोठारे यांनी आदिनाथ कोठारे याला ‘माझा छकुला’ या चित्रपटातून लाँच केले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आदिनाथने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून दिली होती.
अभिनेत्यासोबतच आदिनाथ निर्माता म्हणूनही समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर ‘सरगम’ या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होते. शिवाय ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेचासुद्धा निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११ मध्ये लग्न केले. आदिनाथ आणि उर्मिला हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे.
Leave a Reply