अॅड. श्री प्र. वा. रेगे यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे शाखेचे कार्यकारी विश्वस्त म्हणून गेली अनेक वर्षे मराठी साहित्य संवर्धनाचे, व संस्कृतीप्रचाराचे स्वीकारलेले कार्य, अत्यंत एकनिष्ठतेने व कल्पकतेने साध्य केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत या ग्रंथालयाने भरपूर यश प्राप्त केले आहे. अनेक नवेदित मराठी कवी, साहित्यीक, नाटयकर्मी यांना उत्साह दि्वगुणीत करण्यासाठी त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, ग्रंथालयाने अभिनव योजना कार्यान्वित केले.
रेगे हे सारस्वत बँक ठाणे शाखेचे ते माजी अध्यक्ष व संचालक राहिले आहेत. त्यांनी संस्थेच्या इमारतपुनर्बांधणीत कार्यकारी विश्वस्त या नात्याने मोलाचे मार्गदर्शन तर केलेच, शिवाय उत्स्फुर्तपणे या बहुआयामी योजनेसाठी साडे बारा लाखांची भरघोस देणगी दिली. याची कृतज्ञता म्हणून संस्थेच्या नवीन इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सभागृहास, त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कै. वा. अ. रेगे आणि कै. सुंदराबाई वा. रेगे यांचे नाव दिले गेले आहे. त्यांचे चिरंजीव मकरंद रेगे हे तसेच योगदान संस्थेचे विश्वस्त या नात्याने देत आहेत. विशेषतः कायदेशीर बाबींबद्दल ते संस्थेला मार्गदर्शन करीत असतात.
१९९९ मध्ये प्र. वा. रेगे यांनी स्थानिक साहित्यीकांना एकत्र बांधण्याच्या हेतुने संस्थेकडे एक लाख वीस हजार रूपये सुपुर्द करून त्याच्या व्याजातून ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ठ ललित मराठी साहित्य निर्मिती करणार्या लेखकांना प्रत्येकी पाच हजार रूपयांची दोन स्वतंत्र बक्षिसे दरवर्षी देण्याचा घाट घातला होता. या प्रस्तावानुसार आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील कित्येक लेखकांना त्यांच्या संस्मरणीय साहित्य निर्मितीसाठी संस्थेच्या वार्षिकोत्सवामध्ये ( त्यांचे वडिल श्री. वा. अ. रेगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ) सन्मानपूर्वक पारितोषके देण्यात आली आहेत. त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांमुळे व प्रसिध्दी करण्याकरिता त्यांनी शोधून काढलेल्या निरनिराळया तंत्रांमुळे, त्यांच्या काळात लेखकांची गुणवत्ता व संख्या या दोन्ही घटकांमधला सुवर्णमध्य साधला गेला व मराठी साहित्य ग्रंथालय ही संस्था नावारूपास आली.
Leave a Reply