अजित भुरे यांचा जन्म १३ जानेवारी १९६१ रोजी झाला.
अजित भुरे यांचे शालेय शिक्षण मुंबईतील बालमोहन शाळेत आणि पुढील शिक्षण रूपारेल कॉलेजात झाले. तिथे त्यांना नाटकाची पहिली ओळख झाली. त्यांनी काम केलेली चित्रकथी ही एकांकिका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पहिली आली होती.
पुढे अजित भुरे आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी मिळून ‘आंतरनाट्य’ नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेचे ’अनाहत’ नावाचे पहिले नाटक, राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पहिले आले. अंतिम फेरीत अजित भुरे यांना दिग्दर्शनाचे बक्षीस मिळाले.
अजित भुरे यांनी व स्मृती शिंदे यांनी मिळून ’मालामाल’ ही दूरचित्रवाणी मालिकाही बनवली होती. रेस्टॉरन्ट या वेगळ्या पठडीतल्या मराठी सिनेमाची निर्मिती त्यांचीच होती. त्यांनी आयआयटी इंटरकॉलेजिएट एकांकिका स्पर्धेचे अनेक वर्षे आयोजन केले आहे.
यानंतर पुढील दहा वर्षांत, अजित भुरे आणि मित्रमंडळींनी जवळजवळ पंधरा नाटके केली. त्यांमध्ये, जशी मॅक्बेथ, ऑथेल्लो, गॅलिलिओ, मातीच्या गाड्याचे प्रकरण ही अभिजात नाटके होती, तशीच सांधा, अखेरचे पर्व व मिटली पापणी ही तीन वेगळ्या प्रकारची नाटकेही होती. या प्रयोगांवरून अजित भुरे यांना नाट्यदिग्दर्शनाच्या विविध शैलींचे ज्ञान झाले.
वेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत.
— संजीव वेलणकर.
Leave a Reply