अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शर्मिला ठाकरे ह्यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे.
अमित ठाकरे यांचा जन्म दिनांक ५ ऑक्टोबर १९९२ साली मुंबईत झाला. अमित यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण R.A.Podar महाविद्यालयात पूर्ण केले. पुढे ते उच्च शिक्षणासाठी कॅनडामध्ये गेले. तिथे त्यांनी Douglas College in New Westminster इथून त्यांनी उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त केली.
अमित ठाकरे हे फक्त राजकीय व्यक्तिमत्त्व नसून त्यांच्यात त्यांच्या वडीलांचे कलागुण पुरेपूर उतरलेले दिसतात. त्यांच्यात एक व्यंगचित्रकार दडलेला आहे.
सध्या ते वडीलांच्या सोबतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्याला वाहून घेत आहेत आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवीत आहेत.
#Amit Thackeray
Leave a Reply