तेली, अमोल

अमोल तेलीचे प्राथमिक शालेय शिक्षण नाशिक येथे तर त्यापुढील शिक्षण ठाण्यातील “ठाणे महाविद्यालया”तून पत्रकारितेतून घेतले. त्याने “बी.एम.एम” केले आहे. नकलाकार म्हणून त्यानी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक नामवंत कलाकार तसेच खेळाडू व पक्षी, अनेकविध आवाजात त्यानी प्राविण्य मिळवले आहे.  चित्रपटाल्या अनेक नायकांचे आवाज तो अगदी सहजगतीने काढतो. यामध्ये अभिनेता शाहरुख खान, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, आमिर खान, अक्षय कुमार यांसारख्या सुपरस्टार्सचा समावेश आहे. यासोबतच अनेक पक्षी आणि प्राण्यांचेही आवाज तो काढू शकतो. अनेक कलाकारांबरोबरच तो खेळाडू तसेच समाजातील मान्यवरांची हुबेहुब नक्कल करुन दाखवतो. अमोलनी आत्तापर्यंत अनेक स्टेज शोज आणि इव्हेंट केले आहेत.

सध्या जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीमध्ये निर्मिती सहाय्यक या पदावर कार्यरत असून,भविष्यात डबींग आर्टीस्ट तसेच रेडिओ जॉकी, समालोचन सारख्या निवेदन प्रकारात स्वत:चा आवाज त्याला द्यायचा आहे.

[a-link-ms][31733] ५५ आवाजांची अमोलता हा लेख वाचा[/a-link-ms]

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*