शिक्षण बी.कॉम., गेली २० वर्षे संगीतात कार्यरत, पु.ल. देशपांडे ह्यांच्या हस्ते मानपत्र, ई.टी.व्ही./झी.टी.व्ही./सह्याद्री/साम/दूरदर्शन/आकाशवाणी वर गायनाचे कार्यक्रम. अनघा पेंडसे या ठाण्यातील एक प्रसिद्ध गायिका असून वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी संगीत साधनेस सुरुवात केली. बी.कॉम पर्यंत शिक्षण घेऊन गेली २० वर्षे सतत त्या कलेची सेवा करीत आहेत. गायन कलेचा प्रसार करण्यासाठी त्या झटत आहेत. श्री अरुण दाते, श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकरांबरोबर तसेच अवधूत गुप्ते, राहुल सक्सेना ह्यांच्याबरोबर अनघाजींनी अनेक कार्यक्रम केले.
आपल्या संगीतसेवा प्रतिष्ठानातर्फे रसिकांसाठी दर्जेदार कार्यक्रम केले. ठाणेकरांसाठी अनेक ठिकाणी ॐकार साधना कार्यशाळा राबविल्या व अनेक नवीन गायक, कलाकार यांना घडवून ठाण्याची सांस्कृतिक घडण अधिक समृद्ध केली.
पुरस्कार : पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते मानपत्र मिळाले.
Leave a Reply