आनंद दिघे हे ठाण्यातील नावाजलेलं राजकीय व्यक्तिमत्व होतं. त्यांना ठाणेकर नागरिकांकडून ‘ धर्मवीर ‘ ही पदवी प्राप्त झाली होती. आनंद दिघे ह्यांनी प्रचंड प्रमाणात समाजकार्य केलं आणि जनमानसात प्रचंड मान मिळवला. सामान्य जनतेवर आनंद दिघे यांनी कधीच अत्याचार होऊ दिला नाही. नेहमी ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
ठाण्यात शिवसेना कोणी फुलवली असेल तर ते आनंद दिघे ह्यांनी. अहोरात्र ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत करत ठाण्यात शिवसेनेचा झंझावात रुजवला.
अशा ह्या धर्मवीराचा जन्म दिनांक २७ जानेवारी १९५२ रोजी ठाण्यातच झाला. सध्या ठाण्यातील टेंभी नाक्यावर जो नवरात्रोत्सव चालतो व दहीहंडी उत्सव साजरा केला जातो , त्या उत्सवांना मूर्त स्वरूप आनंद दिघे ह्यांनी दिले आहे. आज हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत.
आनंद दिघे ह्यांचं देहावसान २६ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
#Anand Dighe, Thane
Leave a Reply