आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात परंतु त्याची माहिती नसते. निसर्ग रोजच्या रोज अनेक चमत्कार दाखवत असतो जे अनुभवायला आपल्याला वेळच नसतो. पण आपल्या ठाण्याची एक व्यक्ती अशी आहे जी प्रकाशचित्रांच्या माध्मातून हे क्षण नुसते टिपत नाही तर त्यावरुन एक कथानकच सांगू लागते; ती व्यक्ती म्हणजे छायाचित्रकार आनंद शिंदे.
दहा वर्षं छायाचित्र पत्रकार म्हणून कार्यरत असलेले आनंद शिंदे यांनी विधी क्षेत्रात पदवी मिळवली आहे. आपल्या छायाचित्रणाच्या छंदाला व्यवसायात बदलून त्यांनी आजवर हिंदुस्तान टाईम्स, महाराष्ट्र टाईम्स, डी.एन.ए., दैनिक भास्कर या वृत्तपत्रांसाठी आणि चित्रलेखा आणि यू.एस.पी. एज या मासिकांसाठी छायाचित्रण केलं आहे.
पुरस्कार : त्यांना त्यांच्या आजवरच्या प्रवासात “फोटोग्राफी पोर्टेट”, “लॅक्मे फॅशन मुमेंट ऑफ द इयर”, “ब्रेव्हरी अॅवॉर्ड” अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.
Leave a Reply