अनंत मराठे हे गायक पं. राम मराठे यांचे कनिष्ठ बंधू. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. रामशात्री या चित्रपटात त्त्यांनी बेबी शकुंतला यांच्या बरोबर बाल अभिनेता म्हणून काम करून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अनेक मराठी हिंदी गुजराथी बंगाली चित्रपटात त्त्यांनी कामे केली होती. बरखा, सीता स्वयवर, जय संतोषी मा, संपूर्ण रामायण भरत मिलाप अशा दोनशेहून अधिक पौराणीक चित्रपटात कामे केली.
जावई माझा भला या चित्रपटातील भुमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.
प्रपंचमाया या दूरदर्शन मालिकेतही त्यांनी अभिनय केला होता. प्रभातच्या ‘रामशास्त्री’ य गाजलेल्या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले व त्यांनी स्वतः गायलेले ‘दोन घडीचा डाव’ हे गाणे खूप गाजले होते.
अनंत मराठे यांचे १९ फेब्रुवारी २००३ रोजी निधन झाले.
Leave a Reply