अनंत तरे

राजकीय नेते

शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचा जन्म २३ ऑक्टोबर रोजी झाला.

अनंत तरे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेत्यांपैकी एक होते. ठाण्यात अनंत तरे या नावाला एक वलय होतं. शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी तरे यांचा नेहमीच सन्मान केला. अनंत तरे हे ठाण्याचे माजी महापौर होते. त्यानंतर २००० मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. २००८ मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली.

ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं. त्यानंतर १९९४ आणि १९९५ सालीही महापौरपद भूषविलं होतं.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*