नाट्य-सिनेसृष्टीमध्ये वढावकर हे आडनाव नवं नाही. आधी राम वढावकर यांच्या निमित्ताने त्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांचे पुत्र उज्ज्वल तथा आप्पा वढावकर यांनी ही जबाबदारी नेटाने आणि कौशल्याने पुढे नेली. संगीताचे संस्कार बालपणापासून झाल्याने आप्पांना संगीत आणि एकूण वाद्यवृंद याबाबत कमालीचं आकर्षण निर्माण झालं. विशेष म्हणजे रुईया कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रासारखे क्लिष्ट विषय घेऊन आप्पा पदवीधर झाले. पुढे बँकांच्या परीक्षाही दिल्या. पण त्यांच्या हातून संगीताची सेवा होणंच विधिलिखित होतं. या आकर्षणापोटीच १९७२ साली ते वसंत देसाई यांच्या ग्रुपमध्ये वादक म्हणून सामील झाले. हामोर्नियम, व्हायोलिन, अॅकॉडिर्अन आणि कि-बोर्ड वाजवण्यात आज त्यांचा हातखंडा आहे. वसंत देसाईंपासून स्नेहल भाटकर, सुधीर फडके आदी दिग्गजांकडे वादक म्हणून भूमिका बजावल्यानंतर १९८०च्या दरम्यान त्यांनी संगीत संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली. आज ते तब्बल ४० वर्षं वादक, संगीत संयोजक म्हणून काम करतायत. या काळात त्यांनी तब्बल पाच हजारांवर कार्यक्रमांमध्ये वादक, संयोजक या नात्याने सहभाग घेतला. यात संयोजन केलेल्या कार्यक्रमांची संख्या ४००हून अधिक! या दरम्यान त्यांनी प्रभाकर पंडित, यशवंत देव, गजानन वाटवे, स्नेहल भाटकर, शाहीर साबळे, केदार पंडित यांच्यापासून श्रीधर फडके, मिलिंद इंगळे, मंदार आपटे या पिढीपर्यंतही काम केलं. काही महिन्यांपूवीर्च त्यांनी ‘लिट्ल चॅम्प्स’च्या एका मैफलीत संयोजनाची भूमिका निभावली. अशा तऱ्हेने तब्बल चार पिढ्यांबरोबर आप्पांनी काम केलं. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना केशवराव भोळे, प्लॅटिनम डिस्क आदी पुरस्कारांनी गौरवण्यातही आलं. संगीत संयोजकांच्या हक्कांसाठीही आप्पांनी वेळोवेळी कंबर कसली. पूवीर् एखादा अपवाद वगळता संगीत स योजकांची नावं जाहिरातींमध्ये कधीही नसायची. पण संगीतकारापेक्षा त्याचं संयोजन ही मोठी जबाबदारी असल्याचं ठामपणे पटवून देत जाहिरातीमध्ये तशा क्रेडिट लाइनची व्यवस्था झाली, ती त्यांच्या प्रयत्नांमुळेच. वादक आणि संगीत संयोजन सांभाळतानाच, पुढच्या पिढीमध्ये संगीत संयोजक तयार व्हावेत म्हणून, ‘सुलभ स्वरलिपी’ या पुस्तकाचंही लेखन केलं. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणचे फुल लेंग्थ कार्यक्रम वाजवण्याचा विक्रमही आप्पांच्याच नावावर जमा आहे. १९९० सालामध्ये परळचा दामोदर हॉल, रवींद नाट्यमंदिर, शिवाजी मंदिर आणि सिटीलाइट माकेर्टमध्ये त्यांनी हा विक्रम केला. इतकंच नव्हे, तर गेल्या वषीर् ‘कुटंब रंगलंय काव्यात’ या कवितावाचनातही आप्पा सहभागी झाले होते. आप्पांची संगीतावरची निष्ठा, प्रेम पाहून संगीतकार यशवंत देव यांनी आप्पांवर एक काव्यही रचलं. स्वरांमध्ये रममाण होणा-या या मुशाफिराने नुकतीच साठी पूर्ण केली. आप्पांकडून असे योगदान यापुढेही संगीतसृष्टीला मिळत राहील यात शंका नाही.
## Appa Vadhavkar
I would like to make my cd of Gujarati songs. What is the time frame and expense I would be looking at. My home phone number is 832 519 0551. I live in Houston Tx. U.S.A.
Namaste Appaji, I sent you message yesterday about your availability for recording Gujarati songs and your charges. I had sent my home phone number. My what app number is 832 419 1961. May I have your phone number? I do plan to come to Mumbai in late Fe., March. Thanks