आप्पा गोगटे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देवगड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेत नेतृत्व करणारे आप्पा गोगटे यांनी उभ्या हयातीमध्ये जनतेप्रती वडीलकीचे नाते जपले.

त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला.

कृषी उत्पन्नावर केंद्र शासनाचा आयकर नाही. मात्र, राज्यशासनाने कृषी उत्पन्नावर मोठा कर बसवला होता. ३६ हजारांवर उत्पन्न असणार्‍यांना ५० टक्के कर आकारला होता. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हय़ातील आंबा बागायतदारांवर यामुळे मोठेच आर्थिक संकट कोसळले होते. तशा नोटिसाही आल्या.. मात्र, अन्य प्रकारच्या कृषी उत्पादकांना अशा नोटिसा काढल्या नव्हत्या. आप्पासाहेब गोगटे यांनी हा प्रश्न विधानसभेत वेळोवेळी मांडला. अन्य आमदारांना याबाबतची कल्पना त्यांनी दिली.

देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेची पाणीपट्टी शहरी दराने घेतली जात होती. आजकाल झपाट्याने विस्तार होणारे देवगड तेव्हा एवढे काही विकसित झाले नव्हते. ही बाब हेरून आप्पासाहेबांनी पाणीपट्टी ग्रामीणच्या दरानुसार करून घेतली. ग्रामीण योजना असताना शहरी प्रमाणे दर आकारणी करणे योग्य नाही, भागात लहानशी नगरपरिषदही नाही. देवगड जामसंडेसह ११ गावांना पाणीपुरवठा करणारी ही योजना संपूर्णपणे ग्रामीणच आहे. ही बाब आप्पासाहेबांनी तत्कालीन पाणीपुरवठामंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे मांडली. यानंतर निर्णय झाला.

कणकवली तालुक्यातील वायंगणी, कुरंगवणे अशा अनेक गावांतील पाणीप्रश्नांवर तोडगा काढून आप्पासाहेबांनी मतदारसंघ टँकरमुक्त होण्यासाठी आपल्या कार्यकालात अपार मेहनत घेतली. शेतकर्‍यांची शेती-बागायती वाचवण्यासाठी आप्पासाहेबांनी अनेक बंधारे मंजूर करून घेतले. जुन्या किंवा आतापयर्ंत प्रचलित असणार्‍या देवगड मतदारसंघातील किनारपट्टी भागात गावोगावी आप्पांच्या कार्याची साक्ष देत हे बंधारे उभे आहेत.

आप्पा गोगटे यांचे १६ जुन २०१३ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*