अरुण साधू

लेखक

एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये अरुण साधू यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जुन १९४१ रोजी झाला. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या.

‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. टाईम्स ऑफ इंडीया, स्टेटसमन, फ्री प्रेस जर्नल,केसरी, माणूस, इंडीयन एक्सप्रेससाठी त्यांनी काम पाहीलं होतं.त्रिशंकू, बहिष्कृत, स्फोट या कादंबऱ्याही प्रचंड गाजल्या.यातील बहिष्कृत ही कादंबरी जवळपास ४ दिवसांत त्यांनी लिहून पूर्ण केली होती.६ वर्ष ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहीलं.

झिपऱ्या, तडजोड, शोधयात्रा या ही कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. बेचका,एक माणूस उडतो त्याची गोष्टी, बिनपावसाचा दिवस,मुक्ति, ग्लानिर्भवती भारत हे कथा संग्रह प्रसिद्ध झाले.

अरुण साधू यांचे २५ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*