अरविंद देशपांडे यांचं नाटय़वेड खरं तर कमालीचं टोकाचं होतं. त्यांचा जन्म ३१ मे १९३२ रोजी झाला.
प्रसिद्ध अभिनेत्री सुलभा देशपांडे ह्या अरविंद देशपांडेंच्या पत्नी होत. अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’ शेवटी अशा चार-पाच चिठ्ठय़ा जमा झाल्यावर सुलभाताईं त्यांना म्हणाल्या, ‘‘या चिठ्ठय़ा घ्या आणि गोदरेजचं कपाट आणा.’’ त्या वेळी पहिलं कपाट घरी आलं..
विजय तेंडुलकरांची नाटकं अरविंद देशपांडे त्या काळात दिग्दर्शित करीत होते.
अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे.
३ जानेवारी १९८५ रोजी त्यांचे निधन झाले.
Leave a Reply