अरविंद विष्णू गोखले

लेखक

अरविंद गोखले यांचे शिक्षण पुणे व मुंबई येथे बी.एस्‌सी.पर्यंत झाले. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९१९ रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला. अरविंद गोखले हे सुप्रसिद्ध मराठी लेखक होते.
१९४१ मध्ये ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी त्यांनी मिळविली.
१९४३ पासून त्यांनी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. १९६३ नंतर ते मुंबईच्या धरमसी कंपनीत नोकरी करीत होते.

अरविंद गोखले यांचे २४ ऑक्टोबर १९९२ रोजी निधन झाले.

त्यांचे प्रकाशित साहित्य:

पाकिस्ताननामा – पद्मगंधा प्रकाशन
मंजु़ळा – पॉप्युलर प्रकाशन
अरविंद गोखले यांची कथा – काँटिनेंटल प्रकाशन
अनवांच्छित – काँटिनेंटल प्रकाशन
चाहूल – काँटिनेंटल प्रकाशन
कथांतर – पॉप्युलर प्रकाशन
कथाई – काँटिनेंटल प्रकाशन
निर्वाण – मेनका प्रकाशन
जन्मखुणा – काँटिनेंटल प्रकाशन
कथाष्टके – काँटिनेंटल प्रकाशन
शपथ – काँटिनेंटल प्रकाशन
देशांतर – पॉप्युलर प्रकाशन
शुभा – काँटिनेंटल प्रकाशन
टिळक – महाराष्ट्र विद्यापीठ
केळफूल – मेनका प्रकाशन
शकुंत – काँटिनेंटल प्रकाशन

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*