अतुल कुलकर्णी

Kulkarni, Atul

अतुल कुलकर्णी हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९६५ रोजी झाला. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर या व्यक्तिरेखेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती व नटरंग या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.

मातीमाय हा त्यांचा चित्रपट टोरोंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. नटरंग हा त्यांची अगदी वेगळ्या शैलीतली भूमिका असलेला चित्रपट फार गाजला.
बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुल कुलकर्णींनी दहावीपर्यंतचे शिक्षण हरिभाई देवकरण हायस्कूल, सोलापूरमध्ये पूर्ण केले. त्यांचे आईवडिल सोलापूरला स्थिरस्थावर झाले. १२वी बेळगावमध्ये पूर्ण करून तेथील अभियांत्रीकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पण आभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी.महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.
शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमातील नाटकात काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी सोलापुरातील “नाट्य आराधना” नावाच्या हौशी नाट्यसंस्थेचे सदस्यही बनले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर त्यांना नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली व त्याच्यातच कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९२ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. १९९५ साली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली.
त्यांना २००० साली हे राम तर २००२ साली चांदनी बार या चित्रपटांमध्ये उत्कृष्ठ अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मनित करण्यात आले होते.
संकेतस्थळ : www.atulkulkarni.com 
## Atul Kulkarni

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*