अविनाश नारकर

नाट्य, चित्र अभिनेता 

अविनाश नारकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित नाव आहे. चित्रपट , मालिका , नाटकं ह्या क्षेत्रात कित्येक वर्षांपासून अविनाश नारकर कार्यरत आहेत. अगदी black and white च्या जमान्यापासून ते आताच्या रंगीत काळापर्यंत त्यांचा अभिनय प्रवास सुरूच आहे. इतक्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी अनेक चित्रपट केले. त्यातली सगळी नावं घेणं थोडंस कठीणच आहे पण मी पण सचिन , घर होतं मेणाचं , राजा शिवछत्रपती , बालक पालक , स्पंदन , बस स्टॉप , व्हॉट अबाऊट सावरकर , सूर राहू दे , आई ग , चॅम्पियन्स , अजिंठा , उदय , बालगंधर्व , स्वातंत्र्याची ऐशी तैशी ह्या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे.

अविनाश नारकरांनी अनेक नावाजलेल्या मालिकांमधून कसदार अभिनयाचं प्रदर्शन केले आहे. त्यातील शिवाजी ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल.

अविनाश नारकरांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला १९९४ सालापासून सुरुवात केली. त्यांचा अभिनयाचा प्रवास रंगभूमीपासून सुरुवात झाला. त्यांची गंध निशिगंधाचा , नंदी , सोबत सोबत , हँडस् अप , ती फुलराणी , रणांगण आणि अलीकडच्या काळातील सोयरे सकळ ही नाटकं प्रचंड गाजली. नाट्यक्षेत्रात काम करीत असताना त्यांची ओळख आताच्या सुप्रसिद्ध मराठी नायिका ऐश्वर्या नारकर ह्यांच्याशी झाली आणि पुढे ती ओळख रेशीमगाठीत परिवर्तीत झाली. अविनाश नारकरांनी ऐश्वर्या नारकरांशी लग्न केलं.

ह्या अनिश्चित क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी आपली जबाबदारी ओळखत बेस्ट ह्या सरकारी संस्थेत नोकरी केली.

अविनाश नारकर हे प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्टही आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या आवाजाने अनेक पात्र जिवंत केलेली आहेत. त्यांनी प्रभो शिवाजी राजा ह्या कार्टून सिरीजला आपला आवाज दिला आहे.

अविनाश नारकरांनी अभिनय क्षेत्रात कार्यरत असताना ऐश्वर्या आर्टस् अँड थिएटरस्ऐश्वर्या आर्टस् अँड व्हिजन ह्या दोन संस्थांची निर्मिती केली.

असा हा हरहुन्नरी कलाकार ८ जुलै १९६५ साली मुंबईत जन्मला. अविनाश नारकर ह्यांचं बालपण मुंबईच्या प्रसिद्ध असलेल्या परळ नगरी मध्ये गेले.

#Avinash Narkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*