(मे 1831- 29 ऑगष्ट 1906)
मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाड्गमयाचे जनक. पुर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. जन्म बेळगावचा. शिक्षण बेळगाव आणि मुंबई येथे. बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये शिकत असतांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान मिळाले; बायबल; तसेच अब्राहम. इझाक इत्यादींच्या कथा हे सर्व इंग्रजी समजू लागल्यानंतर वाचले; मुंबईच्या प्री चर्च विद्यालयात `बैबल मास्तर` म्हणून काम केले. हळूहळू ख्रिस्ती धर्माकडे ओढा निर्माण झाला. काही काळ ते `परमहंस मंडळी` हया प्रगतिक विचारांच्या गुप्त संघटनेतही होते; परतु तेथे व्यक्त होणारे नास्तिक विचार; तसेच मंडळाच्या पुस्तिकेतील कोणताही धर्म ईश्वर दत्त नाही व कोणतेही शास्त्र ईश्वरप्रणीत नाही अशा आश्याचे विचार त्यांना पसंत न पडल्यामूळे त्यांनी हया संघटनेशी संबंध तोडला.
ख्रिस्ती धर्म स्विकारण्याची त्यांची इच्छ त्यानंतर अधिकाधिक तीव्र होत गेली व अखेरीस 3 सप्टेंबर 1854 रोजी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. ख्रिस्ती झाल्यानंतर ते पुण्यास गेले. पुणे येथे त्यांचे वास्तव्य सु. 16 वर्ष होते. तेथे असताना त्यांनी बरीच वर्ष प्री चर्च मिशनच्या शाळेत शिक्षकाचे काम केले; पुण्याच्या प्री चर्च मिशनच्या मंडळाचे पाळक म्हणून 1867 मध्ये त्यांची नेमणूक झाली; परंतु 1873 मध्ये या कामाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतला लेखनास वाहून घेतले. 1873 आधीही त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झालेली होतीच. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या शंभराहून अधिक आहे. स्त्रीविद्याभ्यास निबंध (1852), व्यमिचारनिषेधक बोध (1854), यमूनापर्यटन (1857), सर्वसंग्रही उर्फ निबंधमाला (1860), हे त्यांच्या आरंभीच्या ग्रंथापैकी काही होत.
Leave a Reply