बाळ कुडतरकर

ज्येष्ठ निवेदक बाळ कुडतरकर यांचा जन्म २१ ऑगस्ट १९२१ रोजी झाला.

आकाशवाणी वरील दमदार आवाज अशी बाळ कुडतरकर यांची ओळख होती. १९५०, ६० व ७०ची दशके त्यांचा आवाज आकाशवाणीचा अविभाज्य घटक होता. मुंबई आकाशवाणीवरील ‘प्रपंच’ व ‘पुन्हा प्रपंच’मधील त्यांचे टेकाडे भावोजी घराघरातले लाडके भावोजी बनले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खारेपाटणजवळील सोनाळे हे कुडतरकर यांचे मूळ गाव. कोकणात त्या वेळी शिक्षणाची चांगली सोय नसल्याने कुडतरकर यांची आई कृष्णाबाई त्यांना व आपल्या इतर दोन भावांना अशा तीन मुलांना घेऊन मुंबईत आली.

१९३९ मध्ये तेव्हाच्या ‘बॉम्बे युनिव्हर्सटिी’ची मॅट्रिकची परीक्षा दिली. शाळेत असताना कुडतरकर यांची चित्रकला चांगली होती. शाळेतील शिक्षकांनी मॅट्रिकनंतर ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी ‘जेजे’त प्रवेश घेतला.

पार्श्वनाथ आळतेकर हे आवाजाच्या क्षेत्रातील कुडतरकर यांचे गुरू व मार्गदर्शक. त्यांच्या तसेच नानासाहेब फाटक यांच्याही नावाने अनेक वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘अभिनय’ या नावाची नाटय़संस्थाही त्यांनी काही काळ चालविली.

पूर्वीच्या काळी विविध उत्पादनांच्या जाहिराती, चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखविले जाणारे माहितीपट, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या जाहिराती, आकाशवाणीवरील कार्यक्रम असो किंवा चित्रपटाचे डबिंग असो. या सर्व ठिकाणी बाळ कुडतरकर यांनी आपल्या भारदस्त आणि दमदार आवाजाच्या जोरावर जगावर राज्य निर्माण केले.

आकाशवाणीवर ‘आर्टिस्ट’ म्हणून लागलेले बाळ कुडतरकर ‘कार्यक्रम निर्माता’ म्हणून निवृत्त झाले. बाळ कुडतरकर म्हणजे आकाशवाणीचे कार्यक्रम लोकप्रिय करणारा हुकमी एक्का असे समीकरण त्या काळात तयार झाले होते. ‘गंमत जंमत’, ‘कामगार सभा’, ‘वनिता मंडळ’ हे कार्यक्रम लोकप्रिय करण्यात बाळ कुडतरकर यांचे महत्त्वाचे योगदान होते.

बाळ कुडतरकर यांनी ते आव्हानही स्वीकारले. दहा मिनिटांच्या या माहितीपटाचे भाषांतर आणि आवाज देण्याचे मानधन म्हणून कुडतरकर यांना त्या काळात ३०० रुपये मिळाले होते. पुढे अनेक ‘युद्धवार्ता’सह फिल्म्स डिव्हिजनच्या अनेक माहितपटांना मराठीत कुडतरकर यांचाच ‘आवाज’ असे.

बाळ कुडतरकर यांचे ७ फेब्रुवारी २०२० रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*