MENU

बापूराव पेंढारकर

मराठी रंगभूमीवर स्त्री भूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक बापूराव पेंढारकर यांचा जन्म १० डिसेंबर, १८९२ रोजी ग्वाल्हेर येथे झाला.

व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे ‘ललितकलादर्श’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने अनेक नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली.

त्याचवेळी बोलपटांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती, पण बापूरावांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले.

आत्तापर्यंत कवी ना. घ. देशपांडे यांनी लिहिलेली आणि जी. एन. जोशी यांनी गायलेली व संगीतबद्ध केलेली ‘रानारानात गेली बाई शीळ’ ही कविता पहिले मराठी भावगीत समजले जात होते.

बापूराव पेंढारकर यांचे निधन १५ मार्च १९३७ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*