तडाखेबाज निर्णय घेऊन ते धडाकेबाजपणे अंमलात आणणारे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ख्याती आहे.
आपल्या अल्प कारकिर्दीत देखील त्यांनी स्वत:मधल्या कुशल प्रशासकाची जाणीव करुन दिली. त्यांच्या कामाचा उरक, तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता यामुळे राज्याच्या विकासाचा वेग अधिकच वाढण्यास मदत झाली. अमरावती व नाशिक या दोन नव्या प्रशासकीय विभागांची निर्मिती, लातूर, जालना व सिंधुदुर्ग या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती, कुलाबा जिल्ह्याचे “रायगड” असे मानकरण असे महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय त्यांनी घेतले.
त्यांच्याच कारकिर्दीत मानखुर्द – नवी मुंबई रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली. दाभोळसह कोकणातील चार लघुबंदराच्या कामासही त्यांनी गती दिली. प्रशासकीय कार्यालय नवी मुंबईत हलविण्याची कल्पना त्यांचीच होती. यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. तत्काळ निर्णयक्षमता, प्रखर बुद्धिमत्ता, काम उरकण्याचा विलक्षण झपाटा व समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ यामुळे बॅरिस्टर अंतुलेंचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या मनावर कायम कोरले गेले आहे.
Leave a Reply