भालचंद्र नेमाडे

भालचंद्र नेमाडे यांचे उच्च शिक्षण, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून, व डेक्कन कॉलेजातून झाले. नंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी सांगवी, खानदेश येथे झाला.

कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते… ‘ भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला’ या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता.

कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या “चांगदेव पाटील” या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्यार लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली. कादंबर्यां्शिवाय त्यांचे ‘देखणी’ आणि ‘मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत.

रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्याल नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. “साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.

नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*