भास्कर चंदावरकर यांनी रवी शंकर यांच्या पत्नी अन्नपुर्णा देवी यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचं शिक्षण घेतलं. त्यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी झाला.
चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणा-या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी केलं.
संगीतकार म्हणून घाशीराम कोतवालच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर त्यांचा सामना हा सिनेमा चांगलाच गाजला. सामनामधली त्यांची गाजलेली गाणी रसिक श्रोते कधीच विसरू शकणार नाहीत. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे याच सिनेमातलं गाणं. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली.
भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे.‘ घाशिराम कोतवाल ’ हे नाटक, ‘ सामना ’ , ‘ सिंहासन ’ सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे.
भास्कर चंदावरकर यांचे २६ जुलै २००९ रोजी निधन झाले.
Leave a Reply